नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासदार दिलीप गांधी यांच्यासह ६४ जणांचे शस्त्र जमा करून त्यांची परवाने रद्द केले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच नेत्यांसह अनेकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल जिल्ह्यातील ६४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले. विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.