अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भर चौकात १६ वर्षाच्या मुलीला घेऊन काही जण उभे असतात…जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन मुलीचा लिलाव सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते आणि घटना दुसर्या देशात नव्हे तर भारतातील आहे !
हे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून
उत्तर प्रदेशातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव केल्याची धक्कादायक घटना घडली. बुलंदशहरमधील अहमदगढ ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय मुलीवर बोली लावण्यासाठी 20 ते 80 वर्षांचे पुरुष जमले होते. यावेळी मुलगी सतत रडत होती.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास
लिलावात बोली लावणाऱ्यांचा नंबर येताच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला जात होता. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती विनवणी करत होती मात्र याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. यावेळी पोलीस या ठिकाणी पोहोचताच लिलावासाठी जमलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी 2 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला महिला सेलच्या सुरक्षेत ठेवण्यात आले असून कुटुंबीयांची वाट पाहत आहेत.
हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,रांचीत राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या आईचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर साव्त्र आईने तिला कलावती नावाच्या महिलेला 50 हजार रुपयांत विकलं. कलावती नौरंगाबाद गावात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार असल्याची बातमी पसरली आणि लोकांनी चौकात गर्दी केली.
हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !
गावातील चौकात अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार आहे हे समजल्यानंतर अनेकांनी तिथं गर्दी केली. यामध्ये 20 वर्षांच्या तरुणापासून 80 वर्षांपर्यंतच्या वृद्ध पुरुषांचाही समावेश होता. एका व्यक्तीने सर्वाधिक 80 हजार रुपये बोली लावली होती तेव्हाच त्या ठिकाणी पोलिस आहे. पोलिसांनी तिथं कलावती, राजेश देवी, धीरेंद्र, जितेंद्र, इंद्र सिंह, महेंद्र यांना अटक केली.
हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
मुलगीला नौरंगाबादमध्ये नेल्यानंतर याची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी थोड्याच वेळात लोक जमा झाले. यावेळी गर्दी झाल्याने मुलगी पाहण्यासाठी रांग लावली होती. ज्याचा नंबर यायचा तो रक्कम सांगायचा आणि मुलीशी बोलायचा. सुरुवातीला तिला याची कल्पना नव्हती पण जेव्हा आपली विक्री होत असल्याचं समजलं तेव्हा ती रडायला लागली.
हे पण वाचा :- वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार !
आरोपी कलावतीने याआधीदेखील काही मुलींची विक्री केली असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कलावती ही झारखंडमधील मुलींची ३० ते ५० हजार रुपयांमध्ये खरेदी करते आणि इतरत्र त्यांची एक लाख रुपयांमध्ये विक्री करते.