अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राहुरी तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले. ते मी कधीही विसरणार नाही. माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण राहुरी येथील मराठी शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी असलेली नाळ कधी तुटणार नाही.
आता नगरपालिका व सरकार आपलेच आहे त्यामुळे विकास करता येईल. राहुरी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लावणार. तसेच एमआयडीसीचा विस्तार व विकास कसा करता येईल . यासाठी मी प्रयत्न करणार. अशी ग्वाही यावेळी नामदार तनपुरे यांनी दिली .
यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, ‘ मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते यावर एकच हशा पिकला . मात्र पुढच्या वेळेस विकास कामाच्या जोरावर कॅबिनेट मंत्रीपद जनतेच्या आशीर्वादाने मिळेल , असे काम आपण करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे आमदार नामदार प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास , ऊर्जा व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने नागरीकांच्यावतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन दिनांक ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी राहुरी शहरातील नवीपेठ भागात करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.