Ahmednagar News : एसटी महामंडळाने आणलेल्या ई-बस सेवेचा प्रारंभ १ जून रोजी होणार आहे. ज्या नगर-पुणे मार्गावर पहिली बस धावली, त्याच मार्गावरून पहिली ई-बसही धावणार आहे. यासाठी नगरमध्ये इ बस दाखल झाली आहे.
उद्या सकाळी ९.३० वाजता एकाच वेळी पुणे आणि नगर येथून बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून ज्या ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून बस सुटली, त्याच ठिकाणाहून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकातून सकाळी ९.३० च्या सुमारास बस सोडण्यात येणार आहे.
समारंभपूर्वक ही बस सोडली जाईल, तर पुण्याहून दुपारच्या सुमारास नगरमध्ये दाखल होणाऱ्या पहिल्या ई-बसचेही स्वागत केले जाणार आहे. नगरमध्ये पहिली बस माळीवाड्यात आली होती, मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे आता तेथे बस नेणे शक्य नसल्याने बसस्थानकातूनच ती सोडण्यात येणार आहे.
त्यासाठी आधीच नगरला एक ई-बस दाखल झाली आहे. महापालिकेने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर चार्जिंगची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. लवकरच एसटीचे चार्जिंग स्टेशन नगरला उभारण्यात येणार आहे.