अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या.
काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले.
श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे पाटील व भानुदास मुरकुटे गटाने बाजी मारली. सेनेचा झेंडा दोन ठिकाणी फडकला, कॉंग्रेसने संगमनेरची जागा कायम राखली. नेवाशात क्रांतिकारी पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली.
या पंचायत समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नगर तालुका पंचायत समितीवर पुन्हा सेनेचाच झेंडा फडकला. गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचे पंचायत समितीवर वर्चस्व आहे. ते वर्चस्व कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले.
नगर पाठोपाठ पारनेर पंचायत समितीवही शिवसेनेचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीच्या मदतीने सेनेने बाजी मारली. शिवसेनेकडे सभापती तर राष्ट्रवादीकडे उपसभापती पद आले.
श्रीगोंद्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसने बाजी मारली. या ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती झाला. कर्जतलाही राष्ट्रवादीने बाजी मारली. जामखेडमध्ये वेळेत अर्ज न आल्याने आज (दि. ८) या ठिकाणी निवड होणार आहे.
शेवगावला घुले गटाने आपले वर्चस्व कायम राखले. पाथर्डीत भाजपाचे कमळ फुलले.अनेक वर्षांपासून सेनेचे पंचायत समितीवर वर्चस्व आहे. ते वर्चस्व कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले.
नगर पाठोपाठ पारनेर पंचायत समितीवही शिवसेनेचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीच्या मदतीने सेनेने बाजी मारली. शिवसेनेकडे सभापती तर राष्ट्रवादीकडे उपसभापती पद आले.
श्रीगोंद्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसने बाजी मारली. या ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती झाला. कर्जतलाही राष्ट्रवादीने बाजी मारली. जामखेडमध्ये वेळेत अर्ज न आल्याने आज (दि. ८) या ठिकाणी निवड होणार आहे.
शेवगावला घुले गटाने आपले वर्चस्व कायम राखले. पाथर्डीत भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. विखे-मुरकुटे गट एकत्र आल्याने ससाणे गटाला हादरा बसला. राहुरीत ना.प्राजक्त तनपुरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले.
नेवाशात क्रांतिकारी पक्षाने पुन्हा बाजी मारली. संगमनेरमध्ये कॉंग्रेसने आपला गड कायम राखला.अकोले व राहात्यात विखे व पिचडांमुळे भाजपाचा झेंडा फडकला. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली.