सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे,
महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांत होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केले.
यापुढे रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावणार असल्याचं सांगितलंय. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दररोज तीन हजारांच्यापुढे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे.
दरम्यान कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेनं तोंडाला मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. WHO ने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हटलं आहे की सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक आहे.
नवीन गाइडलाइमध्ये हे मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरण्यात यावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे.हे मास्क तुम्ही घरी तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता.
हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या. घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे. हा मास्क सॅनिटाइझ करावा शक्य असेल तर धुवावा. एका कपड्याचा मास्क हा कोरोनापासून बजाव करेलच हे सांगता येत नाही.