आमदार संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीला

Ahmednagarlive24
Published:

 नगर : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी ही बैठक बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत या जागेवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला न सोडल्यामुळे विखे यांनी भाजपची वाट धरली. 

दरम्यान, राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे. भाजपकडून खासदार दिलीप गांधी यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी गांधी समर्थक करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र राजकीय हालचाली जोरात सुरू झालेल्या आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment