Honda Cars : ग्राहकांसाठी मोठा झटका ! होंडा वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ; पहा नवीन किंमत

Updated on -

Honda Cars : Honda Cars India कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना (customers) मोठा धक्का दिला आहे. ज्या कारच्या किमतीत वाढ झाली आहे त्यात कंपनीच्या लोकप्रिय सेडान सिटी (होंडा सिटी), अमेझ सबकॉम्पॅक्ट सेडान आणि क्रॉस-ओव्हर WR-V यांचा समावेश आहे.

होंडाने आपल्या वाहनांच्या किमती 20,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेले दर तातडीने लागू केले जाणार आहेत. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे की होंडाने आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी एप्रिलमध्येही कंपनीने ग्राहकांना धक्का दिला होता.

WR-V

होंडाने त्याच्या कारमध्ये क्रॉसओवर WR-V च्या किमती कमीत कमी वाढवल्या आहेत. कंपनीने या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत 11,900 रुपयांनी वाढ केली आहे, तर डिझेल व्हेरिएंट 12,500 रुपयांनी महागला आहे. अशा प्रकारे, Honda WR-V ची सुरुवातीची किंमत 8.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी त्याच्या टॉप मॉडेलसाठी 12.24 लाखांपर्यंत जाते.

होंडा सिटी

कंपनीने चौथ्या पिढीच्या होंडा सिटीच्या किमतीत २०,००० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. अशा प्रकारे कारची नवीन एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये झाली आहे. तर पाचव्या पिढीची होंडा सिटी 17,500 रुपयांनी महाग झाली आहे.

यानंतर, कारची सुरुवातीची किंमत 11.46 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे, जी 15.47 लाख रुपयांपर्यंत जाते. तथापि, नुकत्याच लाँच झालेल्या City Hybrid e:HEV च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

होंडा अमेझ

Honda च्या सर्वात परवडणारी सबकॉम्पॅक्ट सेडान Amaze ने किंमत 12,500 रुपयांनी वाढवली आहे, त्यानंतर कारची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपये झाली आहे. अशाप्रकारे, होंडा अमेझच्या टॉप मॉडेलची किंमत आता 11.30 लाख रुपयांऐवजी 11.43 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe