व्हीआयपी लाट? आता या मोठ्या अभिनेत्याला कोरोना

Published on -

corona news : कोरोनाची चौथी लाट आलेली नाही व एवढ्यात येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे व्हीआयपी मंडळींना कोरोनाची लागण होण्याची जणू मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येते.

आता अभिनेता शाहरुख खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही तासांपासून अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याचे दिसून येते. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानं नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.

त्याच्या बर्थडेनिमित्तानं एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही पार्टी करोनाचा हॉटस्पॉट ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान उपस्थित होता.

या ग्रॅंड बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी ५० ते ५५ जणांना करोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अशा राजकीय नेत्यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe