आर्थिक विवंचनेतून दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / साेलापूर :- जिल्ह्यातील मोहोळ येथील एका दांपत्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अनेक ठिकाणाहून पैसे गोळा करून फ्रीज दुरुस्तीचे दुकान टाकले. मात्र, गेल्या दोन वर्षापासून दुकान व्यवस्थित चालत नसल्याने पती-पत्नी चिंतेत होते. त्यातच नैराश्य आल्याने पती-पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

श्रीशैल चंद्रकांत म्हेत्रे (३२) व स्नेहा श्रीशैल म्हेत्रे (२८) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशैल म्हेत्रे हा आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ, भाऊजय असे एकत्रितपणे मदले मळा येथे राहण्यास होता.

श्रीशैल याचे यशवंत नगर परिसरात श्री स्वामी समर्थ रेफ्रिजरेशन सर्व्हिसेस नावाचे फ्रिज दुरुस्तीचे दुकान आहे. गेल्या दोन वर्षापासून दुकान व्यवस्थित चालत नसल्याने श्रीशैल व त्याची पत्नी स्नेहा नैराश्यात होते.

दि. ७ रोजी रात्री १० वाजण्याच्यादरम्यान श्रीशैल व त्याची पत्नी स्नेहा हे दोघे खोलीत झोपण्यासाठी गेले. दरम्यान दि. ८ रोजी सकाळी खूप वेळ होऊनही श्रीशैल व त्याची पत्नी दोघेही खोली बाहेर न आल्याने श्रीशैल याच्या आईने दरवाजा वाजविला.

मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा ढकलला असता पती-पत्नीने घरातील पत्र्याचे शेडमधील लोखंडी पाईपला साडीच्या साहयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment