अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वच नगरकरांनी सहभागी व्हावे. मनपाकडे घंटागाड्या आहेत. कचरा घंटागाडीत टाकावा. इतरत्र कचरा टाकू नये. या संदर्भात प्रबोधन व जनजागृती करावी. कुणी ऐकत नसेल, कचरा टाकत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल.
आपण ‘थ्री स्टार’ रँकींगच्या शर्यतीत असून, सर्वांनी सक्रिय सहभाग दिल्यास शहराला 25 कोटींचे पारितोषिक निश्चित मिळेल, असा विश्वास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केला.
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक महापौर वाकळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे,
हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, के.डी.खानदेशी, सर्वोत्तम क्षीरसागर, आदिनाथ जोशी, शिवप्रसाद जोशी, शरद कुलकर्णी, ज्योती केसकर, मोरेश्वर मुळे, देवराम ठुबे, विश्वास काळे, बाळकृष्ण पात्रे, अशोक आगरकर, विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, मुकेश साठे, आशा गायकवाड आदी उपस्थित होते.
स्वच्छता सर्व्हेक्षणात नगर शहर आता 275 वरुन 100 च्या आत आलेले आहेत. ओडीएफ प्लस मानांकन आपल्याला मिळाले आहे. स्वच्छ व सुंदर शहरासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे महापौरांनी सांगितले. यावेळी उपमहापौर ढोणे, सभापती शेळके, क्षीरसागर, खानदेशी आदींनी सूचना मांडल्या.