अहमदनगर जिल्ह्यातील या पहिलवानास शरद पवारांनी केली तब्बल १२ लाखांची मदत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला, पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला.

हर्षवर्धन तसा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या कोंभाळणे येथील गावचा रहिवासी मात्र त्याने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत हे यश संपादित केले.

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धन सदगीरला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता हर्षवर्धन सदगीर याला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल १२ लाखांचा धनादेश देऊ केला आहे.

आज त्याचे प्रशिक्षक काका पवार यांनी स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या मल्लास अवघे २० हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले , त्यानंतर विद्या प्रतिष्ठान, बारामती या ट्रस्टतर्फे त्याला ही मदत देण्यात आली.

हर्षवर्धन ने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढून त्याने हे यश मिळवले आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची गरज होती. पवार यांनी हेच लक्षात घेत हर्षवर्धनला ही मदत देवू केली 

कुस्ती खेळावर प्रेम असणारे शरद पवार यांनी या पूर्वीही आधीचे महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत यांनाही अश्याच स्वरूपात मदत केली आहे.

हर्षवर्धनचे वडिल एका शाळेत प्रयोग शाळेतील लॅब शिक्षक आहेत.हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, राज्यशास्त्र विषय घेतला आहे.

पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment