अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजकीय द्वेषापोटी कुणी कुठेही गड उभा करू शकत असेल; पण गड, गादी व महंत यापेक्षा कोणीही मोठे नाही. भगवानबाबापासून मला वेगळे करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मी भगवानगडावर आल्यावर दगड मारले,
परंतु भगवानबाबांजवळ न्याय आहे. गडाचे महंत स्वतः न्यायाचार्य आहेत, अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी पाच वर्षांपूर्वी भगवानगडावर तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मुंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली होती.
डोंगरदऱ्यातून पोलिसांनी मुंडे यांना सुरक्षित स्थळी हलवले होते. त्यानंतर भगवानगडावर भाषणबंदीचा निर्णय महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी घेतला होता.
धनंजय मुंडे यांनी पंकजांचा नामोल्लेख टाळून अत्यंत खोचक व मार्मिक शब्दांत टीका केली. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली’ अशा घोषणा गडावरून दुमदुमल्या होत्या.
मात्र गुरुवारी कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला’ अशा घोषणा ऐकू आल्या. मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाबांच्या गादीचे दर्शन घेतले. तेथे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी भगवानबाबा व पांडुरंगाची मूर्ती देऊन मुंडे यांचा सत्कार केला.
माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी पाच वर्षांपूर्वी भगवानगडावर तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. त्यावेळी पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी धनंजय मुंडे यांना येथून सुरक्षित हलविले. त्यानंतर भगवानगडावर भाषण बंदीचा निर्णय महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला.
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केल्यापासून महंत व पंकजा मुंडे यांच्यात मतभेद विकोपाला जाऊन भगवानगडावरील भाषणासाठीच्या अट्टाहासावरून सावरगाव येथील दसरा मेळावाचा जन्म झाला.
धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगड मारणारे पंकजा मुंडे समर्थक होते व गोपीनाथगडाची निर्मिती या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून अत्यंत खोचक व मार्मिक शब्दात टीका करत महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या विषयी अधिक श्रद्धा व सहानुभूती व्यक्त केली.
ज्या गडावर माझ्यावर दगडफेक करण्यात आली होती, तिथेच आज भगवान बाबांनी मला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी गडावर गेल्यानंतर व्यक्त केली. महाराजांनीच मला गडावर येण्याची आज्ञा केली होती. माझ्या आयुष्यातील हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण असल्याचंही ते म्हणाले.