Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली. आता शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
गर्जे हे आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. शिवाजीराव गर्जे हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत.
ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे मुंबईचे ऑफिस सांभाळतात. यापूर्वीही अनेक निवडणुकांच्यावेळी त्यांचे नाव चर्चेत असे.
आता त्यांना प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ही त्यांच्यासाठी आणि पक्षासाठीही मोठी कसोटी ठरणार आहे.
तर भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांनी आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खोत हे भाजपचे सहावे उमेदवार असणार आहेत.