नवी दिल्ली : विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याचे समजते.
त्यांचा मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. पण आपण राजीनामा देणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं. पण अखेर त्यांनी पक्षा कडे राजीनामा दिला आहे असे बोलले जात आहे.
सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं होतं.
सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं होतं.