पुण्यात RSS च्या शिक्षकाला संघ शाखेत जाऊन मारहाण

Published on -

Maharashtra news : चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या वादातून संघ शिक्षकाला बेदम मारहाणीची घटना पुण्यातीस सहकारनगर भागात घडली.

हर्षवर्धन सुनील हरपुडे (वय २१, सहकारनगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यावरून कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरपुडे हे संघाच्या शाखेत मुलांना प्रशिक्षण देतात. पूर्वी हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख हे शाखेत येत असत. चार ते पाच वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये वाद झाल्यामुळे त्यांनी शाखेत जाणे बंद केले होते.

दोन दिवसांपूर्वी हरपुडे नेहमीप्रमाणे शाखेत गेले. तेथे काही मुले त्याचा सहकारी अमित हिरणवाळेला मारहाण करत होती म्हणून हरपुडे यांनी मध्यस्थी केली. आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News