Panjabrao Dakh News: पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) हे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. अगदी शेतकऱ्याच्या बांधापासून ते टीव्हीपर्यंत सर्वत्र पंजाबरावाच्या (Panjabarao Dakh) हवामानाच्या अंदाजाच्या चर्चा बघायला मिळतात. गेल्या काही वर्षात पंजाबरावाचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी (Farmers) फायद्याचा ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
पंजाबराव यांनी हवामान अंदाज वर्तविण्याची कसब कशी शिकली असावी असा सवाल अनेकदा उपस्थित केला जातो. याबाबत पंजाबराव देखील आपण निसर्गाच्या संकेतावरून हवामानाचा (Weather Forecast) अचूक अंदाज बांधत असल्याचा दावा करत असतात.
आता निसर्गाचे संकेत ओळखायचे कसे आणि निसर्गाच्या संकेतावरून पावसाचा अंदाज बांधायचा कसा हा प्रश्न तुमच्या देखील मनात आता उपस्थित झाला असेल. असं असेल तर काळजीच करू नका आता आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं नाव म्हणजे पंजाबराव डख यांनी स्वतः निसर्गाच्या संकेतावरून पाऊस कधी पडतो आणि कसा पडतो हे कसं ओळखायचं हे सांगितले आहे.
पंजाबराव डख निसर्गाच्या बदलावरून तसेच नैसर्गिक वस्तूंच्या हालचालीवरून पक्षी पक्ष्यांच्या बदलत्या स्वभावावरून पावसाचे भाकीत वर्तवित असतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. 21 व्या शतकात आपण वावरत असून या 21 व्या शतकात हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी भली मोठी यंत्रणा (IMD) कार्यरत असताना निसर्गाच्या संकेतावरून पावसाचा अंदाज बांधणं हे योग्य आहे का? कदाचित तुमचा प्रश्न रास्त आहे. तुमच्या शंका रास्त आहेत.
मात्र, ज्या ठिकाणी हवामान यंत्रणा फोल ठरली त्या ठिकाणी पंजाबरावांचा अंदाज अचूक ठरला असा दावा आम्ही नाही तर शेतकरी करत आहेत. यामुळे आज आपण निसर्गाच्या संकेतावरून पाऊस कसा पडतो आणि कधी पडतो हे कसं ओळखायचं याबाबत पंजाबराव यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
पाऊस येतो हे कस ओळखणार
»मित्रांनो पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तीन दिवसानंतर पाऊस येण्याची दाट शक्यता असते.
»तसेच लाईटवर किडे, पाकुळे जमा होऊ लागले की पुढच्या तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी सांगितले.
»याशिवाय जुनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच मृग नक्षत्रात जर झाडावरील चिमण्या धुळीत अंघोळ करू लागल्या म्हणजेचं पुढील तीन दिवसांनी पावसाची दाट शक्यता निर्माण होते.
»मित्रांनो पाण्याचे ढग हे वर असतात म्हणून जर आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज आला की पुढच्या 3 दिवसात पाऊस येण्याची शक्यता असते.
»गावरान आंबा जर मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर अशा परिस्थितीत पाऊस चांगला पडतो.
»जून महिन्यात सूर्यावर जर तपकिरी कलर आला की पुढच्या 4 दिवसांनी पाऊस येणार म्हणजे येणार.
»पंजाबराव यांच्या मते, ज्या वर्षी चिंचेला चिंचा जास्त लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते.
»सरडांनी जर आपल्या डोक्यावर लाल कलर केला की पुढट्या चार दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता असते.
»घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील तर पुढच्या चार दिवसात पाऊस पडतो.