अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : नेवासा बु. येथे राहणारे अशोक बहिरू तोडमल, वय ३१ या तरुणास घर बांधकाम करु नको, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व डोक्यात कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले.
जखमी अशोक बहिरु तोडमल या तरुणाने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बहिरु सयाजी तोडमल, संदीप बहिरु तोडमल, दोघे रा. नेवासा बु. यांच्याविरुद्ध भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 जानेवारी रोजी ६ वा. ही मारहाण करण्यात आली. आरोपी हे फिर्यादीचे वडील व भाऊ असे नातेवाईक आहेत. पोलिस पुढील तपास करीत असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !