आई-वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नव्हे तर सर्वसामान्यांचे नुकसान- खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात आपल्या आई – वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नुकसान झाले नसून सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा दावा खासदार डॉ . सुजय विखे यांनी केला.

नगरपालिकेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते.

आपण देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील अनुदानासह पाणीपुरवठा योजना व इतर मुलभूत सेवा – सुविधा शहरवासियांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, पाथर्डीसह तालुक्याने देखील मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीत मतांची आघाडी दिली.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

निश्चितच आपण विकास कामातून आपली जबाबदारी पूर्ण करु, मी तर आत्ताच खासदार झालोय मात्र भाजपची राज्यात पाच वर्षे सत्ता असताना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अधिकचा निधी का आणला नाही, असा टोला त्यांनी माजीमंत्री राम शिंदे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

ते म्हणाले, ‘ जिल्हा परिषदेतील टक्केवारी राज आम्ही संपवले होते.  आमच्या कुटुंबियांची परंपरा संपत्तीसाठी नाही , तर जनसेवेसाठी सत्तेचा वापर करण्याची आहे.  याची सर्वसामान्यांना प्रचिती आली आहे . सर्वत्रच काहिशा प्रमाणात गटातटाचे राजकारण चालू असते. आता जिल्ह्यातील सर्व विरोधक एकत्र आल्याने भाजपतील सर्व नेत्यांनी गट – तट बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.

नवीन अभद्र युतीमधून निर्माण झालेल्या राज्य सरकारने कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यांना जाब विचारण्यासाठी एकत्र बेवून रस्त्यावर उतरुन आंदोलने करण्यात येणार आहेत.

यावेळी पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनिता दौंड व उपसभापतीपदी मनिषा वायकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे प्रतिनिधी म्हणून गोकुळ दौड व रविंद्र वायकर यांचा तसेच भाजपच्या तालकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माणिक खेडकर यांचा विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment