मतदानाआधी अहमदनगरच्या या मंत्र्याची गाडी घसरली, पुढे झाले असे…

Published on -

Ahmednagar News : भाजपचे दोन आमदार आजारी असूनही मतदानाला येत आहेत. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे मतदान चर्चेचा विषय राहिला.

आता महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख यांचेही अशा अवस्थेतील मतदान चर्चेत आले आहे. मंत्री गडाख गाडी घसरल्याने त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि नंतर थेट रुग्णालयात दाखल झाले.

शिवसेनेचे मंत्री गडाख हे विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने येत असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गडाख यांच्या पाठीत तीव्र वेदना जाणवत होत्या.

त्याही अवस्थेत ते सोमवारी सकाळी विधानभवनात आले. आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेत चालत होते. या अवस्थेत त्यांनी कसेबसे मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर मंत्री गडाख यांनी थेट रिलायन्स रुग्णालय गाठले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News