अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मुलीच्या मावशीवरही बलात्कार केल्या नंतर बलात्कार करत असताना त्याने त्याचं व्हिडीओ शूटिंग केलं होतं.
या व्हिडीओची धमकी देत त्याने महिलेच्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवरही बलात्कार केला. हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी आरोपीने दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलगी सध्या गर्भवती असल्याचंही ते म्हणाले आहेत. आरोपीने लग्नाचं अमिष दाखवत २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता.
यावेळी त्याने तरुणीच्या नकळत व्हिडीओ शूट केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एका पार्टीत आरोपीची दोघींशी ओळख झाली होती.
यावेळी त्याने आपलं नाव आशिष दुबे असल्याचं सांगत खोटी ओळख करुन दिली होती. आरोपी मुळचा आसामचा रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार तसंच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com