ग्रामसेवक, सरपंचावर अपहाराचा गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव:  वेळापूर येथील ग्रामसेवक व सरपंचाने संगनमताने शासनाच्या योजनेतील २ लाख ३२ हजारांची पाण्याची टाकी न बांधता केवळ १ लाखात काम करुन १ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

चौदाव्या वित्त आयोगाच्या २ लाख ३२ हजारांतून शिंदेवस्ती वेळापूर येथे पाण्याची टाकी बांधायची होती. कोणतेही काम न करता ग्रामसेवक विनोद गिरीधर माळी, सरपंच गणपत नामदेव वाघ यांनी पदाचा गैरवापर करून ठेकेदार सुनील माधव गुंजाळ यांना १ लाखाचा धनादेश देऊन रक्कम काढून घेतली. 

या प्रकरणी विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी फिर्याद दिल्यानंतर दोघांवर संगनमताने फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment