अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : सावळीविहीर येथील रिक्षाचालक दाविद सुरेश जाधव याच्या मृत्यूप्रकरणी आणखी एकाला शिर्डी पोलिसांनी अटक केल्याने आरोपींची संख्या चार झाली आहे.
ज्या हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली होती तेथील सीसीटीव्ही फुटेज शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानुसार सागर भाऊसाहेब गायकवाड, आनंद बाबा गायकवाड, आशिष नंदू लोंढे यांना अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान पसार असलेल्या आरोपींपैकी एकाला वणी येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. आकाश सुरेश रणधीर असे त्याचे नाव असून, आता आरोपींची संख्या चार झाली आहे.
सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, बारकू सोनवणे, पोलीस कर्मचारी गणेश सोनवणे, किरण कुऱ्हे, सचिन पगारे, फिरोज पटेल यांच्या पथकाने वणी येथे ही कारवाई केली. आणखी संशयित तरुणांच्या मागावर पोलीस पथक आहे.