Pm Kisan Yojana: मोठी बातमी! या शेतकऱ्यांना नाही मिळणार पीएम किसानच्या 12व्या हफ्त्याचे 2 हजार; वाचा सविस्तर

Published on -

Pm Kisan Yojana: पीएम किसान सम्मान निधि योजना (pm kisan sanman nidhi yojana) ही गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना (farmers) वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

हे सहा हजार एकूण तीन समान हफ्त्यात म्हणजेचं 2 हजाराच्या एकूण तीन हप्त्यांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर (bank account) पोहोचला आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. सरकारच्या म्हणण्यानुसार 2 हजार रुपयांची ही रक्कम 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या योजनेचा महाराष्ट्रातील (maharashtra) एकूण एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.  पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हस्तांतरित केला जातो.

31 जुलै ही ई-केवायसी करण्याची तारीख आहे

आता 12 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, सरकारच्या सूचनेनुसार, या दिवसापूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

ई-केवायसी कसे करावे?

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, जेथे EKYC टॅबवर क्लिक करावं लागणार आहे.

आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.

आधार नोंदणीकृत मोबाइल वर आलेला OTP प्रविष्ट करा आणि तुमचे eKYC केले जाईल.

अवैध लाभार्थ्याना पैसे परत करावे लागतील 

पीएम किसान सन्मान निधीचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या लोकांवर सरकारकडून कारवाई केली जात आहे. सरकार बेकायदेशीर लाभार्थ्यांना नोटिसा पाठवून पैसे परत करण्यास सांगत आहे. पैसे परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe