पाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.

Ahmednagarlive24
Published:

पाथर्डी येथील शेवगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या भागातील एका हॉटेलवर बबलू कांबळे आणि संतोष गायकवाड हे दोघे जेवण करायला गेले होते. तेथे त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातच संतोष गायकवाड याने त्याच्याजवळील एअरगनमधून गोळीबार केला. यातच कांबळे जखमी झाले.

कांबळे यांना गोळी लागली का गनच्या दस्त्याने मारहाण झाल्यामुळे ते जखमी झाले, हे रात्री उशीरापर्यंत समजू शकले नाही. घडलेल्या या प्रकाराची आज दिवसभर पाथर्डी शहरात चर्चा होती. सोशल मिडियावरही गोळीबाराबाबत माहिती फिरत होती.

—————————-
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment