काेपरगाव | नगर-मनमाड रस्त्यावर एमपी सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर कंटेनर व दुचाकीची धडक होऊन महिला ठार झाली.
कावेरी विठ्ठल जाधव (२६, राहुरी) असे या महिलेचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कावेरी जाधव या वडील व मुलगा सार्थक यांच्यासह मनमाड येथील लग्न समारंभ आटोपून राहुरी तालुक्यातील शेण वडगाव येथे दुचाकीवर (एमएच १७ सीसी २३१२) जात होत्या.
मनमाडकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कंटेनरची (एचआर ५५ एन ७१८५) त्यांच्या दुचाकीस मागून धडक बसली. या अपघातात कावेरी यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांचे वडील अण्णासाहेब काशीनाथ जगताप (६०) व मुलगा सार्थक विठ्ठल जाधव (२) हे जखमी झाले.