Maharashtra news : मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर राज काय प्रतिक्रिया देणार, या कडे लक्ष लागले होते.
अनकेदा दु:खद प्रसंगी ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असल्याचेही पहायला मिळालेले आहे. त्यामुळे यावेळी राज यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले होते.उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर १५ तासांनी ट्विट करत राज ठाकरे यांनी प्रतक्रिया दिली आहे.
त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता यांच्या कार्यकर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज यांनी म्हटले आहे. “एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”,
असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये कुठेही उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही. पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी उध्दव यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते.