अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू
ही घटना राहाता तालुक्यातील हसनापूर शिवारात दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती. आरोपी कैलास रेवजी पवार व त्याची पत्नी शोभा यांचे आपसात पटत नव्हते. कैलास रोज दारू पिऊन शोभा हिस मारहाण करीत असे. त्यामुळे ती कैलासकडे नांदत नव्हती. याचा राग कैलासच्या मनात होता.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….
दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हसनापूर शिवारात नंदू राठी यांच्या शेतावर शोभा या मजुरीने खुरपणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी दारू पिऊन तेथे गेला. त्याने शेतमालकादेखत शोभास शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना ओढून घरी घेऊन जाऊ लागला.
हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !
शेतालगतच्या रस्त्यावर शोभा यांना नेऊन त्याने खिशातून चाकू काढला व शोभा यांच्यावर सपासप वार केले व त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. शोभा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !
पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तेथून पुणे येथे पाठविण्याचा सल्ला वैद्यकांनी दिला. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या जाऊ शकल्या नाहीत. जखमांमुळे त्यांना उठता- बसता येत नव्हते. त्यानंतर त्यांचा दि. २ नोव्हेंबर २०१६ रोजी मृत्यू झाला होता.