उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांना मोठा दिलासा

Published on -

Maharashtra news :सत्तेवर पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक बातमी आली आहे. ठाकरे यांचे मेहूणे म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याविरूद्ध सीबीआयने दाखल केलेली केस बंद करण्यात आली आहे.

सुमारे ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला आहे.

व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती. अधिक तपासात पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचं सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाने ईडीने श्रीधर पाटणकरांच्या ठाणे येथील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या होत्या. जवळपास साडे सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. मात्र ईडीच्या विरोधानंतरही सीबीआय विशेष न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला रिपोर्ट स्वीकारला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News