अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुडके मळा परिसरात एका विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुभम सुनील जाधव या विद्याथ्र्यास सोनू सुडके, प्रवीण नेटके (दोघे रा. सुडके मळा) यांनी विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच आमच्या नादी लागला तर कुटुंबातील लोकांना जीवे ठार मारू अशी धमकी दिली.
याप्रकरणी शुभम जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.