अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठवाड्यातील पाथरी (जि.परभणी ) येथे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या मुद्यावरुन सध्या वादाचे मोहोळ उठले आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकास आराखड्याचे लवकरच भूमीपूजन केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा दाैऱ्यावर असताना केली होती.मुख्यमंत्र्याच्या या घोषणेनंतर शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शिर्डीवासीयांचा आक्षेप काय ? साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचा दावे प्रतिदावे केले जातात. साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हेच एकमेव दस्तऐवज असुन त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही,जन्मस्थळाचा पुरावा नसताना पाथरीचा जन्मस्थळ म्हणून उल्लेख करण्यास शिर्डीवासीयांचा आक्षेप आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भुमीपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.
साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठीकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत दावे प्रतिदावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा चावलेला प्रयत्न निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली.
जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली. आपला धर्म,पंथ,जन्म याबाबत कोठेही वाच्छता केली नाही. साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हेच एकमेव दस्तऐवज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही.
असे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ती साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यांच्याकडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीचा विकास करण्याला आक्षेप साईभक्त तसेच शिर्डीकरांनी घेतला आहे. पाथरीचा ज़रूर विकास करा पण जन्मस्थळाच्या नावाला शिर्डी करांचा विरोध आहे.