Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरीं नको रे बाबा…! 53 हजारात ‘हा’ शेती पूरक व्यवसाय करा, 35 लाखांची कमाई होणार; कसं ते वाचाचं 

Ajay Patil
Published:

Business Idea: भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असताना देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) नको रे बाबा असे म्हणू लागले आहेत. शेतीमध्ये लाखों रुपयांचा खर्च करून सुद्धा अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmers Income) मिळत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता शेती व्यवसायापासून दुरावत चालला आहे.

मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि त्याला शेती पूरक व्यवसायाची सांगड घातली तर निश्चितच शेतकरी बांधवांना लाखों रुपयांचा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधव शेती पूरक व्यवसाय करण्याच्या तयारीत असतील तर आजची ही बातमी विशेष त्यांच्यासाठीच. मित्रांनो आज आम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय अतिशय कमी भांडवलात सुरु करता येतो आणि लाखो रुपयांची कमाई देखील यातून होते. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे कडकनाथ कोंबडी पालनाचा (Kadaknath Rearing). चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कडकनाथ पालनाविषयी (Kadaknath Farming) सविस्तर.

मित्रांनो आपल्या देशात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय एम.पी. आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. एमपी आणि छत्तीसगड मधील आदिवासी भागात कडकनाथला कालीमासी असं म्हणतात. हा कोंबडा पूर्णपणे काळा असतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कडकनाथ कोंबडीचे मांस आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कडकनाथ कोंबडीला त्याच्या औषधी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे. यामुळे कडकनाथ पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

एमपी आणि छत्तीसगड मध्ये प्रामुख्याने केला जाणारा हा व्यवसाय आता देशातील इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील कडकनाथ पालन आता होत आहे. राज्यातील शेतकरी बांधव हळू हळू कडकनाथ पालन कडे वळू लागले आहेत. कडकनाथ पालन हा व्यवसाय निश्चितच फायद्याचा सौदा ठरणार आहे. देशातील केवीके कडकनाथ चे पिल्ले उपलब्ध करून देण्यास असमर्थ असल्याने आपण या व्यवसायाची व्याप्ती ओळखू शकता.

कडकनाथ कोंबडा महाग का विकला जातो?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कडकनाथ कोंबडा आणि कोंबडीचा रंग काळा असतो, मांस देखील काळ असते आणि रक्त देखील काळे असते. या कडकनाथच्या मांसामध्ये लोह आणि प्रथिने सर्वाधिक आढळतात. त्याचबरोबर कडकनाथच्या मांसात फॅट म्हणजेच चरबी आणि कोलेस्टेरॉलही कमी प्रमाणात आढळते.

यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही कोंबडी अतिशय फायदेशीर मानली जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कडकनाथचे सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळतात. यामुळे कडकनाथ कोंबड्याला मोठी मागणी असते शिवाय बाजारात भाव देखील अधिक असतो. त्याची मागणी आणि फायदे पाहता, सरकार त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत करते.

सरकार कशी मदत करते?

कडकनाथ पालन व्यवसायला चालना देण्यासाठी एम.पी. आणि छत्तीसगड सरकार अनेक योजना राबवत आहे. छत्तीसगडमध्ये केवळ 53,000 रुपये जमा केल्यावर सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये 1000 पिल्ले, 30 कोंबडीचे शेड आणि कडकनाथ कोंबडी साठी मोफत आहार देखील उपलब्ध करून दिला जातो. निश्चितच कडकनाथ कोंबडी पालन छत्तीसगड मधील शेतकऱ्यांना विशेष फायद्याचे ठरणार आहे. इतर शेतकऱ्यांसाठी देखील कडकनाथ कोंबडी पालन एक फायद्याचा व्यवहार ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe