अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव : रब्बी हंगामासाठी मुळा धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांना पत्रद्वारे विनंती केली आहे. सध्या चालू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाण्याची गरज आहे.
त्या अनुषंगाने मतदारसंघातील मुळा धरणाचे लाभक्षेत्रातील गावांमधून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
चालूवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, यासारखी पिके शेतात उभी आहेत, या पिकांना सध्या पाण्याची गरज असल्याने मुळा धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे, याकरिता पाटपाणी सोडण्यासाठी नियोजन बैठक होणे आवश्यक आहे.
मुळा धरणात सध्या भरपूर पाणी असून, पाणी सोडण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याने आमदार मोनिका राजळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील व मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या पत्रात रब्बी हंगामातील पिकांसाठी मुळा धरणाचे पाणी सोडण्यासाठी नियोजन होऊन लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी विनंती केली आहे.