India News:सध्या राजकारणात धक्कातंत्र सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही असाच एक धक्का दिला आहे. भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड समितीतर्फे शिखर धवनला कर्णधार तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे.
तर या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे.इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत प्रथम ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर ५ सामन्यांची टी-२० मालिका होईल.
असा आहे भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दिपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर) संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, यजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.