OnePlus 10T Leaks : वनप्लस (OnePlus) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात (India) लवकरच वनप्लसचा 150W फास्ट चार्जिंगचा स्मार्टफोन(Smartphone) लाँच होणार आहे.
कंपनीने नुकताच Nord 2T लाँच केला आहे, जो Nord 2 चे अपग्रेड केलेले मॉडेल आहे. परंतु लाँच पूर्वीच या मॉडेलची डिटेल्स लीक (OnePlus 10T Leaks) झाली आहेत.
लाँच आणि विक्री तपशील
हा स्मार्टफोन भारतात अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. स्मार्टफोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक कलरमध्ये येऊ शकतो. हँडसेटच्या लीक झालेल्या रेंडरमध्ये पंच होल कटआउटसह एक डिस्प्ले दिसला आहे. फोन अलर्ट स्लाइडरशिवाय लॉन्च होऊ शकतो. हा स्मार्टफोन भारतात 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान लाँच केला जाईल.
काय असतील स्पेसिफिकेशन्स?
मागील रिपोर्ट्सनुसार, OnePlus 10T स्मार्टफोन OxygenOS 12 सह लॉन्च केला जाऊ शकतो. यात 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याची प्राथमिक लेन्स 50MP ची असू शकते. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळू शकतात. फ्रंटमध्ये कंपनी 16MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते.
डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4800mAh बॅटरी दिली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. सुरक्षेसाठी कंपनी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देईल. हँडसेटची रचना OnePlus 10 Pro सारखीच असेल.