अहमदनगर लाईव्ह 24 टीम : ‘ माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता . त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे . जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले होते. पक्षाचेही योगदान माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला.
आमचा पराभव झाला, या संदर्भामध्ये पक्षाने वरिष्ठ पातळीवर समिती नेमलेली आहे. ते त्याचा अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच, असे शिंदे यांनी सांगून आमच्यामध्ये कोणताही समेट झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती दिली.
कुणीही पराभवासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवतो. त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलल होते.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते.