अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत.नव्या महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ९ जानेवारीला नियुक्ती झाली आहे.
त्यानंतर सोमवारी ते प्रथमच नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा सल्लागार समितीची, जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
सकाळी अकरा वाजेपर्यंत मुश्रीफ सरकारी विश्रामगृह येथे पोहोचणार आहेत. येथून दुपारी बाराच्या सुमारास ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध बैठकांसाठी रवाना होतील. त्यानंतर बैठका सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली जाणार आहे.
बैठकीत भाजपच्या पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात झालेल्या 15 जून 2019 जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2019-20 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनु. जाती उपयोजना) प्रारूप आराखड्यास मान्यता व ऐनवेळी येणार्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
Web Title – Guardian Minister Hasan Mushrif in Ahmednagar today