अहमदनगर लाईव्ह 24 टीम : कर्जत-जामखेड मतदारसंघात मी पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने आमदार रोहित पवार करीत आहेत. पण एकवेळ त्यांनी ते करणे समजू शकतो. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून भूमिपूजने व उद्घाटने होणे राजशिष्टाचारात बसत नाही, अशी टीका प्रा. शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावर केली होती.
या टीकेनंतर आमदार रोहित पवार नगर मध्ये आले असता याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले ”मी शिंदे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्षच करतो, मी राम शिंदे यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांच्याकडे कोणताच विषय नसल्यामुळे ते अशा पद्धतीने बोलत असतील. पण त्याकडे मी दुर्लक्ष करीत असून, माझ्या मतदारसंघातील लोक काय म्हणतात, हे मी महत्त्वाचे समजतो.
तसेच चारा छावण्या, टँकर व जलयुक्त शिवार अभियान यामध्ये जो गैरप्रकार झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली आहे. त्याअनुषंगाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. चौकशी बाबतचा ठराव देखील बैठकीत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
Web Title – What people in the constituency say is more important than what Ram Shinde says