Ahmednagar News:गोदावरी नदीला पूर आल्याने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथील कुराण बेटाला पाण्याचा वेढा पडला आहे.
तेथे वास्तव्यास असलेले भास्कर शाख यांचे कुटुंबियांनी जनावारांच्या काळजीपोटी बेट सोडून येण्यास नकार दिला आहे.अद्याप पाणी कमी असल्याने बेटावर धोका नाही, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून असल्याचे तहसिदारांनी सांगितले. कुराण बेटावर दहा ते पंधरा एकर जमिनीचा भूभाग आहे.
दीड ते दोन लाख क्युसेस पाणी आल्यावरच तेथे धोका पोहचतो. पाळलेली जनावरे सोडून येण्यास शाख कुटुंबाने तेथून स्थलांतर करण्यास नकार दिला आहे.
नदी काठच्या ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास कुरण बेटावर अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील सध्या ते सुरक्षित आहे अशी माहिती तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली.