अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : कायमस्वरूपी दुष्काळी अशी नगर तालुक्याची ओळख आहे. भोरवाडीतील महिलांना दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दुरवर भटकंती करावी लागते. त्यातच अनेक किलोमिटरवरून डोक्यावर हंडा घेवून पाणी आणावे लागते.
मात्र आता आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून भोरवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपीचा सोडवून येथील महिला भगिणींच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरवू अशी ग्वाही जि.प.सदस्या राणीताई लंके यांनी दिली. नगर तालुक्यातील भोरवाडी येथे आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जि.प सदस्या लंके या बोलत होत्या.
भोरवाडी येथे नुकताच भास्कर भोर यांच्या संकल्पनेतून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते. या कार्यक्रमास लंके या आर्वजुन उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी येथील महिलांना आजवर पाण्यासाठी मोठा संघर्ष केला असून,यापुढे मात्र माझ्या माता भगिणींचे पाण्यासाठी हाल होणार नाहीत याची काळजी घेईल.यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून शास्वत पाणी योजना कार्यान्वित करू.
त्याचसोबत बचत गटाच्या माध्यमतून महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्ष्मीकरण करण्यासाठी पुढाकार घेवू. असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमास योगिता भोर, कल्याणी भोर, शितल महांडुळे, अश्विनी कदम, चंदाताई भोर, नंदाबाई भोर, सीमा भोर, उषाबाई भोर,
मिराबाई भोर, नर्मदा माने, स्वाती माने, दिपाली जाधव, सुषमा भोर, प्रमिला भोर, मनिषा भोर, मिना भोर, शारदा भोर, विमल जासूद, संगिता भोर, अनुसया पानसरे, भारती खैरे, शितल भोर आदी महिलांसह बाबासाहेब भोर, बाबा वाघ, रंगनाथ जासूद, कुंडलिक वाघ, नितीन भोर, आबा भोर, देवराम माने, बाळु गायकवाड, कोंडीबा खैरे, राजेंद्र ठाणगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title – Woman’s Head To Get Off: Lanka