अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामांचा आराखडा काल बुधवार (दि.२२) जानेवारी रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्याकडे सादर झाला आहे. आराखड्यास मंजुरी मिळाली की मार्चपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीत अर्थात येत्या दिवाळीपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात नव्या इमारतीतून दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्हा प्रशासनाचा कारभार सुरू होईल !
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !
सध्या अस्तित्वात असलेली इमारत जुनी झाली. तसेच ही इमारत सध्या शहराच्या वर्दळीच्या भागात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय व मंत्रीमहोदयांच्या बैठकांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या, तसेच व्यक्तिगत कामे घेऊन जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. बैठकांसाठी येणारे पदाधिकारी, अधिकारी यांची वाहने, विविध कामासाठी येणारे नागरिक व दाद मागणारे आंदोलक यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक कोंडीचे स्वरूप येत गेले.
हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील
तसेच सध्याची इमारत ही रस्त्याच्या दुतर्फा वसलेली आहे. इंग्रज राजवटीपासून याच इमारतीत जिल्हा प्रशासनाचा कारभार सुरू आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारच्या तत्कालीन राजवटीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …
मात्र, राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भविष्याचा विचार करून पुढाकार घेत, प्रशस्त जागेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूचा आराखडा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय विश्रामगृहानजीक असलेल्या भूसंपादन विभागाच्या शासकीय जागेत नूतन सहा मजली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीचा आराखडा तयार करण्यात आला. तत्कालीन महसूलमंत्री असलेल्या थोरात यांच्या हस्तेच नूतन इमारतीची पायाभरणी करण्यात आली.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !
एकूण ५७ कोटी रुपयांच्या निधीपैकी या कामासाठी २८ कोटींचा निधी मंजूर होऊन प्राप्त झाला. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची दक्षिणाभिमुख असणारी इमारत पूर्वाभिमुख करण्याची सूचना स्वीकारण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्यातील सत्तेत सत्तांतर झाले. माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला. प्राप्त झालेल्या निधीतून मागील पाच वर्षाच्या अवधित इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
मात्र, अंतर्गत सुसज्जतेसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी प्रतीक्षा करावी लागली. दुसऱ्या टप्प्यात इमारतीतील विद्युतीकरण, अंतर्गत फर्नीचर, गार्डन, रंगसफेदीची कामे करण्यात येतील. नव्या दरानुसार खर्चाचा सुधारित प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारला सादर केला.
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !
त्यावर प्रशासकीय मान्यतेची मोहर उमटली. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील नागपूर येथे संपन्न झालेल्या विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. आवश्यक असलेला निधी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी ही इमारत येत्या नोव्हेंबर पूर्वी पूर्ण होणार आहे.