पालकमंत्री शिंदे म्हणतात खा. दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका, दोन दिवसांत मी पाहून घेतो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंना आश्वस्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर येथे मंगळवारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी सुजय विखे यांच्यासह महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार मोनिका राजळे व शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी आदींसह शिवसेना, भाजप, रासपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment