Business Idea: शेतीतून लाखों रुपये कमवायचे ना…! शेतीसमवेतच ‘हे’ शेतीपूरक व्यवसाय करा, लाखोंची कमाई हमखास होणार

Business Idea: शेतकऱ्यांना एकात्मिक शेती (Farming) पद्धतीचा अवलंब करून उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि त्यांना शेतीसोबतच उत्पन्नाची (Farmer Income) इतर साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

ही कामे करण्यासाठी शेती सोडण्याची गरज नाही, उलट ही कामे शेतीच्या अनेक गरजा पूर्ण करतात. यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन आणि अन्न प्रक्रिया यांचा समावेश आहे.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय- भारतात प्राचीन काळापासून शेतीसोबतच पशुपालनही (Animal Husbandry) केले जात आहे. खरं पाहिले तर ही दोन्ही कामे एकमेकांना पूरक आहेत.

जनावरांसाठी जिथे हिरवा चारा शेतातून पुरविला जातो, तिथे गाई, म्हशी, शेळ्या, उंट इत्यादींचे संगोपन करून खताची गरज भागवली जाते. या कामात सरकार विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन, पशु किसान क्रेडिट कार्ड आणि पशुधन विमा योजना यांचा समावेश आहे.

मत्स्यपालन:- जुन्या काळी मत्स्यपालन (Fish Farming) हे फक्त मच्छिमारांचे काम मानले जात होते, परंतु आज बहुतांश शेतकरी शेतात किंवा टाक्यांमध्ये तलाव बांधून मत्स्यपालन करत आहेत. 

देशातील मासळीच्या वाढत्या वापरामुळे शेतीसोबतच मत्स्यपालनाचा व्यवसाय करणे फायदेशीर ठरू शकते. शेतीसोबतच मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याचीही तरतूद आहे.

मधमाशी पालन आणि मध उत्पादन- देशात मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय मधमाशी (Beekeeping) आणि मध अभियान सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मधमाशी पालन युनिट्स स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची तरतूद आहे. शेतकर्‍यांना हवे असल्यास ऊस, मोहरीसह फुलांची लागवड करताना मधमाशी युनिटची लागवड करून मध उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवता येते.

कुक्कुटपालन – जगभर अंडाची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषत: भारतात कोंबडीबरोबरच अंड्यांचा वापरही लक्षणीय वाढला आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न रातोरात वाढू शकते. कुक्कुटपालनासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते घराच्या अंगणात छोटेसे युनिट लावून कोंबड्यांच्या राहण्याची व्यवस्था करू शकतात.

अळिंबी म्हणजे मशरूम उत्पादन- मशरूम पिकवण्यासाठी (mushroom farming) शेतातील कोठारांची गरज नाही. मित्रांनो मशरूम 6×6 च्या खोल्यांमध्ये देखील लागवड करता येते. मशरूम शेती करून तुम्ही बंपर उत्पादन आणि चांगले पैसे कमवू शकता. 

भारतात देवभूमी उत्तराखंड ते बिहारपर्यंत लागवडीबरोबरच मशरूमचे उत्पादनही खूप लोकप्रिय झाले आहे. भारतात उगवलेले मशरूमही परदेशात निर्यात केले जात असल्याने त्याची लागवड फायदेशीर ठरू शकते.