अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विखेंची जिरविण्यासाठी व राष्ट्रवादीचा विजय खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची २०० युवकांची फौज राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी दक्षिणेत दाखल झाली आहे.
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी आपले चिरंजीव डॉ . सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते.
मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्याने आणि राष्ट्रवादीचेपरिस्थितीत मतदार संघ काँग्रेसकडे जाणार नाही तर राष्ट्रवादीच या मतरादार संघातून निवडणूक लढविणार असल्यचे सांगितले .
त्यानंतर डॉ . सुजय विखे यानी वडिल राधाकृष्ण विखे यांना न जुमनता भाजपमध्ये प्रवेश केला . त्यानंतर पवार यांनी राजकीय खेळ करत आ . शिवाजी कर्डिले यांचे जावई आ . संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी देवून अनेक नेत्यांची गोची केली. विखे विरूद्ध जगताप अशी लढत होणार असून ही निवडणुक मात्र विखे वरुद्ध पवार अशीच रंगणार आहे .