Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत.
आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांने (Grape Grower Farmer) देखील एक धम्माल काम केले आहे. तालुक्यातील वडगाव येथील प्रयोगशील शेतकरी विजय शंकर देसाई या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने एक नवीन द्राक्षाचे वाण (Grape Variety) शोधले आहे.
विशेष म्हणजे या प्रयोगशील शेतकऱ्याने शोधलेल्या या जातीला भारत सरकारने देखील मान्यता दिली आहे. द्राक्षाच्या या नवीन जातीला वीडीएस सीडलेस द्राक्षे (VDS Seedless Grape) असं नामकरण करण्यात आलं असून या जातीचे पेटेन्ट विजय यांना भारत सरकारने देऊ केले आहे. निश्चितच एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने केलेले हे काम कौतुकास्पद असून सध्या या द्राक्ष बागायतदाराची राज्यात चर्चा सुरू आहे.
विजयराव गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष शेती करीत आहेत. विजय रावांच्या मते, आठ वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या द्राक्ष बागेत एका झाडावर वेगळ्या पद्धतीचे द्राक्ष घड दिसले. मग काय विजय रावांनी त्या झाडापासून कलम तयार करून नवीन द्राक्ष रोपे लावली. या द्राक्षे रोपांपासून उत्पादीत झालेले द्राक्षे विजयराव आणि बांगलादेश तसेच मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला.
विजयरावांच्या मते इतर द्राक्षं पेक्षा या द्राक्षाला अधिक दर मिळाला. यामुळे त्यांनी या द्राक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सध्या विजयराव यांच्याकडे सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रावर या नवीन जातीची द्राक्ष लावलेली आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी द्राक्षला दर नसताना देखील विजय यांच्या या नवीन जातीच्या द्राक्षला 112 रुपये प्रति किलो असा दर मिळाला.
विजय यांनी शोधलेली ही वीडीएस सिडलेस जात जास्त रोगप्रतिकारक क्षमता असलेली आहे शिवाय या जातींचे द्राक्षमणी सहा सेंटिमीटर लांब आहेत. या जातीच्या द्राक्षांची पाने मोठी असून द्राक्षे चवीला खुपच गोड आहेत.
विजयरावांच्या मते, ही जात कमी खर्चात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. निश्चितच द्राक्षे उत्पादक शेतकर्याने केलेली ही भन्नाट कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.