अहमदनगर :- खा.दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करण्याची घोषणा केल्यानंतर मतदारसंघातील गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
काही झाले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर सुवेंद्र आजही ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाच्या विखेंचे काम कसे करायचे अशा शब्दांत ते मतदारसंघातील समर्थकांशी संवाद साधत आहेत.
पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड भागाचा दौरा पूर्ण करून सुवेंद्र कमालीचे अॅक्टीव्ह झाले आहेत. सुवेंद्र गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला तर ती सुजय विखे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे.