Business Idea: ऑगस्ट आला रे…! भावांनो ऑगस्टमध्ये ‘या’ भाजीपाला पिकांची लागवड करा, काही महिन्यातचं लखपती बना 

Ajay Patil
Published:

Business Idea: मित्रांनो भारतात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची शेती (Farming) केली जात आहे. भारतीय शेती (Agriculture) ही सर्वस्वी पावसावर आधारित असल्याने खरीप हंगामात शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात.

जुलै महिन्यात खरीप हंगामातील पिकांची शेतकरी बांधवांनी पेरणी केली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील खरीप हंगामातील पिकांची पेरणी उरकून घेतली असून आता शेतकरी बांधव पीक व्यवस्थापनासाठी लगबग करत आहेत.

खरीप हंगामात पारंपरिक पिकांसमवेत शेतकरी बांधवांनी जर भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) केली तर निश्‍चितच त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत असतात. अशा परिस्थितीत आज आपण ऑगस्ट महिन्यात लावल्या जाणार्‍या काही भाजीपाला वर्गीय पिकांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरं पाहता अलीकडे शेतकरी बांधव कमी खर्चात आणि कमी दिवसात उत्पादन देणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकाच्या शेतीकडे अधिक आकृष्ट होत आहेत. भाजीपाला पिके कमी खर्चात उत्पादित होतात शिवाय या पिकांना बाजारपेठेत कायम मागणी असते, यामुळे भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

ऑगस्ट मध्ये लागवड करता येणाऱ्या पिकांची यादी 

गाजर लागवड :- मित्रांनो जर आपणास ऑगस्ट महिन्यात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करायची असेल तर आपण या महिन्यात गाजराची शेती करू शकता. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, ऑगस्ट महिन्यात गाजराची लागवड करून शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात.

कारण की, ऑगस्ट महिन्यानंतर बाजारात गाजराची मागणी अधिक वाढते. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांना गाजर लागवड करायची असेल तर त्यांनी ऑगस्ट महिन्यात गाजर लागवड करावी त्यांना निश्चितच या पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

शलगम लागवड:- शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यात भाजीपाला वर्गीय त्यांची शेती करायचे असेल तर आपण सलगमची देखील या महिन्यात लागवड करू शकता. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते या पिकाची शेती शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारी आहे.

शलगम लागवडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या पिकाची शेती कोणत्याही प्रकारच्या शेतजमिनीत करता येते. मात्र असे असले तरी कृषी तज्ञांच्या मते सलगम लागवड शेतात पाण्याचा पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था असावी. शलगम पिकाला देखील अतिरिक्त पाणी सहन होत नाही.

फुलकोबीची लागवड:- मित्रांनो भारतात फुल कोबीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे फुलकोबी बारामाही मागणीमध्ये असते. खरं पाहता शेतकरी बांधव कायम मागणी मध्ये असलेल्या या फुल कोबीची वर्षभर लागवड करू शकतात.

मात्र असे असले तरी हिवाळ्याच्या काळात बाजारात त्याची मागणी सर्वाधिक असते. अशा स्थितीत ऑगस्ट महिन्यात लागवड केल्यास फुलकोबी पिकाला बाजारात चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या पिकातून शेतकरी बांधवांना चांगले अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

पालक शेती:- पालक हे एक मुख्य भाजीपाला वर्गीय पीक आहे. सर्व भाज्यांमध्ये पालकाला विशेष स्थान आहे. ही भाजी खायला प्रत्येक व्यक्तीला आवडते. अशा परिस्थितीत या भाजीपाला पिकाची बाजारात मोठी मागणी असते. असे असले तरी या भाजीपाल्याची खपत हिवाळ्यात अधिक राहते.

कारण की थंडीत बहुतेक लोक ही भाजी खातात. याशिवाय पालक पीक पावसाळ्यात चांगले उत्पादन देते. येत्या काही महिन्यांत बाजारात पालकाची मागणी झपाट्याने वाढणार आहे. या बाबींचा एकंदरीत विचार करता ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात या पिकाची शेती केल्यास शेतकरी बांधवांना चांगले अतिरिक्त उत्पन्न मिळू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe