अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगीता गोसावी (४०) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी खांडगाव येथे घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला. प्रेस फोटोग्राफर काशीनाथ गोसावी यांच्या त्या पत्नी होत.
सकाळी ६ च्या सुमारास पत्नी घरात नसल्याचे गोसावी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळला.