गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.

Ahmednagarlive24
Published:

राहाता :- गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार-पाच गुंडांनीच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावर घडली.

रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एका गुंडाला पकडून ठेवले. आठवडे बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात.

पिंपळवाडी येथे वीटभट्टीवर काम करणारा मजूर मंजित केवट (मूळ उत्तर प्रदेश) हा आठवडे बाजारासाठी राहात्याला आला होता.

बाजार करताना त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने खेळण्यासाठी बळजबरी केली. तो खेळत नाही हे पाहून त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत केवट याच्या डोक्याला मार लागून तो रक्तबंबाळ झाला. त्याने तशा अवस्थेत पोलिस ठाणे गाठले. कॉन्स्टेबल सुनील मालणकर टोळक्याला पकडण्यासाठी गेले.

एकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात येत असताना सोरट चालवणारा विकी चावरे व त्याच्या दोन साथीदारांनी कॉन्स्टेबल मालणकर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला.

वाहतूक पोलिसाने त्यांना सोडवले. मालणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शिर्डीत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment