अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजस्थानमधील श्रीगंगानगरमधील सादुलशहर पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात 70 वर्षीय वृद्ध महिलेस दोन तरुणांनी मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणार हे घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य त्या वयोवृध्द महिलेसह त्याच गावातील दोन मद्यपी तरुणांनी केल आहे. सध्या पीडित महिलेवर सादुलशहर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पातळ नावाच्या या खेड्यातील एक वृद्ध महिला घरात एकटी होती आणि तिचा मुलगा उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर गेला होता.
वृद्ध महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेत दोन तरुणांनी प्रथम मद्यधुंदपणे वृद्ध महिलेवर हल्ला केला आणि नंतर पिडीत महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
हे पण वाचा :- विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !
रात्री उशिरा पीडित मुलगा घरी परतला तेव्हा त्याला घटनेची माहिती मिळाली.दोन्ही नराधम दारुच्या नशेत तर्रर्र होते. नराधमांनी पीडित महिलेस बेदम मारहाण केली होती.
पीडितेला तातडीने स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी सादुलशहर येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- विधवा मुलीची छेड काढणाऱ्याचा बापाने केला बंदोबस्त,केली भररस्त्यात त्या तरुणाची हत्या !
पीडितेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. दलेर सिंह आणि मीमा सिंह अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.